...आणि एक लाख रुपयांची बॅग परत मिळाली

आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी 1 लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितले आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले. ही घटना घडलीय नितेंद्र शंकलेशा यांच्यासोबत. 

Updated: Oct 16, 2016, 12:44 PM IST
...आणि एक लाख रुपयांची बॅग परत मिळाली title=

कल्याण : आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी 1 लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितले आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले. ही घटना घडलीय नितेंद्र शंकलेशा यांच्यासोबत. 

नितेंद्र यांच्या आईला दुर्धर आजाराने ग्रासलंय. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनसाठी पैसे आणण्यास सांगितलं. ऑपरेशनसाठी लागणारे 1 लाख रुपये ते लोकलमध्येच विसरले. कल्याण स्थानकावर उतरल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. नितेंद्र यांनी तातडीने स्टेशन मास्तरला सांगितलं.

कल्याण स्टेशन मास्तरांनी लगेचच अंबरनाथ आरपीएफ आणि अंबरनाथ स्टेशन मास्तरांना माहिती दिली. त्यानंतर लोकल अंबरनाथमध्ये आल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी लोकलच्या डब्यातून ती रक्कम आपल्या ताब्यात घेऊन ती नितेंद्र यांना परत केली. 

आईच्या ऑपरेशनसाठी जमा केलेली रक्कम रेल्वेने परत केल्याने नितेंद्र यांनी RPF आणि रेल्वे प्रशासनाने आभार मानले आहेत.

Tags: