येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अजुनही अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र येत्या 48 तासात खानदेश आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 13, 2014, 05:26 PM IST
येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता title=

नागपूर : राज्यात अजुनही अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र येत्या 48 तासात खानदेश आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या 48 तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

शेजारील राज्य छत्तीसगडमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. विदर्भातही याचे परिणाम जाणवू लागले आहे.

नागपूरमध्ये शनिवारी सकाळी काही मिनिटे पाऊस झाला. काळे ढग पाहून मुसळधार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु काही वेळातच काळे ढग नाहिसे झाले. आकाशात ढग दाटून येत असल्याने तापमान फारच कमी झालं आहे.

किमान तापमान सामान्यपेक्षा एक डिग्री खाली आले असून ३०.९ डिग्री सेल्सिअसवर पोहचले आहे. शनिवारी ०.८ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भातील वाशिममध्ये सर्वाधिक १३ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गोंदियामध्ये ११.६ मी.मी., अकोला ४.१ मी.मी. , ब्रह्मपुरी १.८ मी.मी. चंद्रपूर ७ मी.मी. यवतमाळ ४.८ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.