‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव

Updated: Jul 13, 2014, 03:13 PM IST
‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव title=

 

सांगली: ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावं, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपुरात दिलाय. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नुकताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. 

दरम्यान, केसरकरांशिवाय शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले, राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात होतं. मात्र या सर्व वृत्ताचा छगन भुजबळ यांनी मात्र इन्कार करत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी मुद्दाम अशा अफवा पसरवत असल्याचं ते म्हणाले. शिवाय आपला राष्ट्रवादी सोडण्याचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचं सत्र सुरू झालंय. याच पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळं आता पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.