मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून

लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Sep 25, 2016, 07:07 PM IST
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून  title=

लातूर : लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातल्या निलंगा, अहमदपूर, चाकूर तालुक्यांतल्या अनेक गावांमधल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे तिथला संपर्क तुटला आहे. तर लातूर तालुक्यातल्या बामणी इथल्या जाना नदीवर बांधलेला एक पूल शनिवारी सायंकाळी वाहून गेला.

सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पूल वाहून गेल्यामुळे बामणी गावाचा लातूरशी असलेला संपर्क तुटला आहे. हा पूल जवळपास २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. त्यामुळे इतक्या कमी कालावधीतच हा पूल कसा वाहून गेला, हा प्रश्न आता विचारला जातोय. दरम्यान पुराचं पाणी काही अंशी ओसरलं असलं तरी बामणी गावच्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

पाहा पूल वाहून जातानाची थरारक दृष्यं