कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

कल्याण-डोंबिवलीत आज दुपारी साडेअकरापासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर एवढा जास्त आहे की कल्याण-डोंबिवलीकर नागरीक बाहेर पडतानाही विचार करतायत.

Updated: Jul 19, 2016, 12:07 PM IST
कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस title=

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत आज दुपारी साडेअकरापासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर एवढा जास्त आहे की कल्याण-डोंबिवलीकर नागरीक बाहेर पडतानाही विचार करतायत.

कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचलंय.या मुसळधार पावसामुळे लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ठाण्यात ही जोरदार पाऊस होत आहे. ठाण्यातही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे.

मुंबई शहरातही आज पहाटेपासून पावसाची रिपरिप वाढलीय. एकंदरीत मुंबई आणि उपनगरांमध्ये तसेच ठाणे जिल्ह्यात पावसाचा चांगलाच जोर आहे.