हाय प्रोफाइल चोरटा लोणावळ्यात गजाआड

बीएमडब्ल्यू मोटारमधून येऊन रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेला गाड्यांच्या काचा कटरच्या साह्याने तोडून लॅपटॉप, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरणारा मुंबईतील हाय प्रोफाईल चोरटा गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मुंबई परिसरात त्याच्यावर ७० ते ८० गुन्हे दाखल असल्याचे लोणावळा पोलीसांकडून सांगण्‍यात येत आहे.

Updated: Apr 17, 2015, 10:43 PM IST
हाय प्रोफाइल चोरटा लोणावळ्यात गजाआड title=

लोणावळा : बीएमडब्ल्यू मोटारमधून येऊन रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेला गाड्यांच्या काचा कटरच्या साह्याने तोडून लॅपटॉप, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरणारा मुंबईतील हाय प्रोफाईल चोरटा गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मुंबई परिसरात त्याच्यावर ७० ते ८० गुन्हे दाखल असल्याचे लोणावळा पोलीसांकडून सांगण्‍यात येत आहे.

इरफान फारुख मेनन (वय ३३, रा. बांद्रा वेस्ट, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजता लोणावळातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर डायमंड हॉटेलच्या समोर अकिव सॅमसन किल्लेकर नावाची व्यक्ती त्यांची स्विफ्ट कार उभी करून जेवणासाठी गेले होते.मात्र परत आले असता त्यांना गाडीची काच तोडून लॅपटॉपची बॅग, लेडीज पर्स, गॉगल आणि पोर्टेबल चार्जर चोरून नेले असल्याचे ध्यानात आले. 

गाडी मालकाने पोलिसांत चोरीची तक्रार दिली होती. पोलिसांनी माहिती घेतली असता गाडीजवळ पांढऱया रंगाची बीएमडब्लू कार उभी करून काळा शर्ट आणि  लाल रंगाची पँट घातलेला माणूस संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही गाडी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

मंगळवारी पहाटे नाइट राऊंड दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल हरी इंटरनॅशनलच्या बाहेर ही बीएमडब्लू कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे पोलीसांना आढळून आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाने गाडीच्या चारी बाजूंनी सापळा रचत आरोपी इरफानला ताब्यात घेतले. त्याच्यावर इतरञ दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे लोणावळा पोलीस उप निरीक्षक नवनाथ गायकवाड यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.