जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव इथे बापानेच मुलीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परधर्मीय मुलाशी प्रेमसंबंध खटकल्याने २८ वर्षीय तरुणीचा गळा आवळून बापाने खून केला.
नसरीन बी अहमद असं मयत मुलीचं नाव असून आरोपीच अब्द्दुल रहीम असं नाव आहे.
विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीचं धरणगाव पोलिसात हजर होऊन खुनाची कबुली दिली, आरोपीला सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.