पुणे : मुंबई सोडून पुणे, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या ठिकाणी, एका प्रभागात ४ उमेदवार आहेत. एका प्रभागात अ, ब, क आणि ड या मधून ४ उमेदवार निवडून येणार आहेत.
मतदान केंद्रात मतदान करताना तुम्हाला, एका प्रभागातील अ, ब, क आणि ड या मधील चारही उमेदवारांना मतदान करावं लागणार आहे, जेव्हा तुम्हाला अ, ब, क आणि ड या मधील प्रत्येकी १ उमेदवाराला मतदान कराल, तेव्हाच बीप वाजणार आहे, आणि जेव्हा बीप वाजेल तेव्हाच तुमचे मतदान पूर्ण होईल.
बीप वाजल्यानंतरच तुमचं मतदान पूर्ण होणार आहे. तुम्हाला एका प्रभागासाठी अ,ब,क आणि ड साठी प्रत्येक १ असे ४ मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे, आणि तुम्हाला फक्त ३ उमेदवारांना मतदान करायचं असेल, तर ज्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचे नाही, त्या ठिकाणी तुम्हाला नोटा म्हणजे या पैकी कुणीही नाही, हा पर्याय वापरता येणार आहे.
समजा एखाद्या मतदाराने एका प्रभागासाठी अ, ब आणि क यासाठी मतदान केले आणि ड साठी केले नाही. तर त्याला ड साठी नोटा पर्याय वापरावा लागेल, तरच मतदान पूर्ण होईल. मतदाराला हे लक्षात येत नसेल आणि मतदान पूर्ण होत नसेल, असा पेच तयार झाला, तर तेव्हा ज्या तीन किंवा २ ठिकाणी मतदान केले आहे, त्यावर कागद ठेवण्यात येईल, म्हणजे केलेले मतदान दिसू नये, यानंतर त्याला जर तुम्हाला कुणालाच मतदान करायचे नसेल, तर नोटा पर्याय वापरून मतदान पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येई