मुंबई : महाराष्ट्रातला 21 वर्षीय आयएएस अनसर शेख सध्या भारतीय सरकारमध्ये सेवा देत आहे.
यूपीएससीमध्ये 361 वी रँक पटकावणाऱ्या अनसरनं या परिक्षेसाठी अनसरनं हलाखीची परिस्थिती असतानाही खडतर प्रयत्न केले होते. पहिल्याच प्रयत्नात अनसरनं प्रीलिम्स आणि मुख्य परिक्षा पास केलीय. आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्याचं समाधान सध्या अनसरच्या चेहऱ्यावर दिसतंय.
पुण्यात शिकत असलेला अनसर मूळचा जालन्याचा... घरची परिस्थिती बेताचीच... वडील एक रिक्षा चालवतात तर आई गृहिणी.. अनसरचं शिक्षण सुरू राहावं यासाठी त्याच्या छोट्या भावालाही आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं... आणि त्यानं एका दुकानात काम सुरू केलं.
अनसरनं मिळवलेल्या या यशानंतर पत्रकार जेव्हा त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घरात एक बल्बही नव्हता... तेव्हा धावत जाऊन त्याच्या भावानं बल्ब विकत आणावा लागला.
अनसरचं प्राथमिक शिक्षण जालन्यातच पूर्ण झालं. त्यानंतर पुण्यात त्यानं राज्यशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्यानं पुण्यातच राहून यूपीएससीची तयारी सुरू केली होती.