कार्ल्याचं प्रसिद्ध एकविरा देवीचं मंदिर 'अनधिकृत'!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मावळच्या तहसीलदारांनी कार्ल्याचे एकविरा देवीचं मंदिर अनधिकृत ठरवलंय. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातल्या लाखो भाविकांचं तसंच ठाकरे घराण्याची ही कुलस्वामिनी आहे. 

Updated: Dec 10, 2015, 11:12 AM IST
कार्ल्याचं प्रसिद्ध एकविरा देवीचं मंदिर 'अनधिकृत'! title=

लोणावळा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मावळच्या तहसीलदारांनी कार्ल्याचे एकविरा देवीचं मंदिर अनधिकृत ठरवलंय. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातल्या लाखो भाविकांचं तसंच ठाकरे घराण्याची ही कुलस्वामिनी आहे. 

या मंदिरासह तालुक्यातल्या ३५ गावांमधली ३८ अनधिकृत धार्मिक स्थळं अनधिकृत ठरवण्यात आली आहेत. मात्र यावर एकविरा देवस्थान विश्वस्त मंडळानं आक्षेप घेतलाय. या मंदिराचा १८५७ च्या गॅझेटमध्येही उल्लेख असल्याचा दावा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते अनंत तरे यांनी केलाय. 

अधिक वाचा - मातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.... साईंचा चमत्कार?

कोणत्या आधारावर मंदिर अनधिकृत ठरवले याचा खुलासा करावा... अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार  २००९ नंतर जी अनधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहे ती निष्कासित करून पुरातन धार्मिक स्थळे नियमित करण्याच्या दृष्टीने ही माहिती गोळा करण्यात आल्याचं स्पष्टीकरण नायब तहसीलदारांनी दिलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.