नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु झाली आहे. 

Updated: Nov 8, 2016, 06:25 PM IST
नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु title=

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु झाली आहे. 

न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण करून २००९ नंतरची अनधिकृत धार्मिकस्थळ निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नाशिक महापालिका हदीतील वाहतुकीला अडथला ठरणारी धार्मिक स्थळ महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या माध्यमातून काढण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

आज पहिल्या दिवशी सिडको विभागातील सातपूर अंबड लिंकरोड परिसरातील ४ ठिकाणी कारवाई करणायत आलीय. नागरिकांचा रोष पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून  महानगर पालिकेच्या सुरक्षा रक्षकासह पोलीसानाचा  मोठा फौजफाटा तैंनात करण्यात आला होता. 

१८ तारखेपर्यंत कारवाई सुरु राहणार असून पहिल्या टप्प्यात रस्त्यावरची किवा रस्त्याला लागून असणारी ८४ अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार  आहेत.