नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे. आक्षेपार्ह विधान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले होते.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर गुरुवारी झालेल्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देण्यासाठी शुक्रवारी सभागृहात उभे होते, तेव्हा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानावरून सत्तारूढ पक्षाचे सदस्य आणि विरोधक आमने-सामने आले होते.
सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी आव्हाडांच्या विधानावर आक्षेप घेऊन त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळात तीन वेळा सभागृह तहकूब करावे लागले होते. त्यानंतर आव्हाड यांना निलंबित करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.