ठाणे : ठाण्यात कळवा खाडीवर असलेला जुना पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. पूल वाहतुकीसाठीच तर सोडाच पण पादचाऱ्यांसाठीही जीवघेणा असल्याचे समोर आले आहे.
हा पूल धोकादायक असून त्वरित बंद करावा असा अहवाल पवई आयआयटीनं ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला मंगळवारीच दिलाय. तसंच तातडीनं दुरूस्ती करण्याचंही सूचवण्यात आले आहे.
मात्र ठाणे महापालिकेनं अजूनही हा पूल बंद केलेला नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून याबाबत तातडीनं कारवाईची मागणी होत आहे.