डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उपअभियंत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात पत्नी, मुलगा असताना त्यांनी आत्महत्या केली.
दत्तात्रय मस्तूद (४६) यांनी मध्यरात्री आत्महत्या केली. रात्री एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दत्तात्रय यांनी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
मस्तूद हे गेल्या काही दिवसांपासून शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. तसेच माजी नगरसेवकासह त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले होते. दरम्यान, एसीबीच्या चौकशीत त्यांच्या नावावर सात सदनिका असल्याचे स्पष्ट झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.