ऑपरेशन डार्क थंडरचे प्रमुख निंभोरकरांची यशोगाथा

नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजेंद्र निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत.

Updated: Oct 2, 2016, 03:44 PM IST
ऑपरेशन डार्क थंडरचे प्रमुख निंभोरकरांची यशोगाथा

अमरावती : नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजेंद्र निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत.

पाकिस्तानच्या सार्जिकल स्ट्राईकवेळी महाराष्ट्राच्या राजेंद्र निंभोरकरांचे नेतृत्व हे अत्यंत महत्वाचे ठरले आहे. वर्धा जिल्ह्य़ाच्या या सुपुत्रावर आज अवघ्या महाराष्टाच्या नजरा आहेत.

वर्धा जिल्ह्यातील वडाळा गावातील एका शेतकरी कुटुंबातील तीन मुलांपैकी एक सेनादलात, दुसरा वायुदलात तर तिसरा नौदलात निवडला जाऊन देशाच्या रक्षणासाठी शीर तळहातावर घेऊन लढण्यासाठी सज्ज राहतात, ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.

राजेंद्र निंभोरकर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवडले गेले आणि आज ते आपल्या कर्तृत्वाने भारतीय लष्करात पंजाब रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट जनरल या हुद्यावर कार्यरत असून ऑपरेशन कमांडचे प्रमुख आहेत. 

सीमापार घुसून केलेल्या आणि किमान ५० दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ‘ऑपरेशन डार्क थंडर’मध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर या वरिष्ठ मराठी लष्करी अधिकाऱ्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली असल्याची माहिती समोर आली आहे. या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आवर्जून गेले होते.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x