दुरूस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे रडतखडत

 महाडनजीकच्या कंरजाडीनजीक रेल्वेनं दुरुस्तीचं काम काढलं आहे. यामुळे मांडवी एक्सप्रेस मागील चार तासांपासून रत्नागिरीत अडकून पडली आहे. शिवाय इतर गाड्या यामुळे खोळंबण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वेवर ओढावलेलं खोळंब्याचं विघ्न अद्यापही कायम आहे.

Updated: Aug 26, 2014, 10:36 PM IST
दुरूस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे रडतखडत title=

रत्नागिरी :  महाडनजीकच्या कंरजाडीनजीक रेल्वेनं दुरुस्तीचं काम काढलं आहे. यामुळे मांडवी एक्सप्रेस मागील चार तासांपासून रत्नागिरीत अडकून पडली आहे. शिवाय इतर गाड्या यामुळे खोळंबण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वेवर ओढावलेलं खोळंब्याचं विघ्न अद्यापही कायम आहे.

प्रवाशांना या कामाची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचं प्रवाशांनी म्हटलंय. काही गाड्या वेळेवर आहेत, मात्र बहुतेक गाड्या उशीरा आहेत, असं कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी म्हटलंय.
 
दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावरच रविवारी वीर आणि करंजाडी दरम्यान मालगाडीचे 8 डबे घसरले होते. रुळावरुन हे डबे घसरल्यानं कोकण रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांचा खोळंबा झाला. ही वाहतूक तब्बल 27 तासानंतर सुरू झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.