कोकणातील डबलडेकर कोणासाठी असा?

कोकणातल्या गणेशोत्सवासाठी सुरु झालेली एसी डबल डेकर ट्रेनचा उपयोग काय, ती कोणासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Updated: Aug 26, 2014, 08:10 PM IST
कोकणातील डबलडेकर कोणासाठी असा? title=

मुंबई: कोकणातल्या गणेशोत्सवासाठी सुरु झालेली एसी डबल डेकर ट्रेनचा उपयोग काय, ती कोणासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

कारण ही ट्रेन प्रिमियम ट्रेन म्हणून चालवली जातेय. यामुळे ही ट्रेन 30 टक्के सुद्धा भरत नाहीय. या ट्रेनच्या पहिल्या दोन फे-यांवरून हे स्पष्ट झालंय.लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी अशी ही ट्रेन सुरु झालीय.

या गाडीची प्रवासी आसनक्षमता 750 इतकी आहे. ट्रेन शुक्रवारी पहिल्यांदा धावली ती फक्त 132 प्रवासी घेऊन....म्हणजेच पहिल्या दिवशी ती फक्त १७ टक्के भरली होती. तर रविवारी ही ट्रेन धावली तेव्हा 232 प्रवासी ट्रेनमध्ये होते.

एवढा कमी प्रतिसाद मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे जसजशी तिकीटं कमी होत जातात तशी तिकीटांची किंमत वाढत जाते. त्यामुळे 625 रुपयांपासून सुरु होणारी तिकिटांची किंमत ही तब्बल चार हजार रुपयांच्या पुढे पोहचलीय. त्यामुळे या महागड्या गाडीकडे कोकणवासियांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.