रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणनजीक खेर्डी येथे मालगाडी घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. चिपळूणच्या खेर्डीजवळ मालगाडीच्या ४२ डब्ब्यांपैकी बारा डबे घसरलेत.
चिपळूण-खेर्डी नजीकच्या ओव्हर ब्रीजजवळ हा अपघात झाला आहे. या मालगाडीचे १२ डबे रेल्वे रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या गाडीतून मुंबईला गहू आणला जात होता. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मालगाडीतून गहू मुंबईकडे आणला जात होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
खेर्डी पुलाच्या कठड्यामुळे मोठी दुर्घटना टळली.. अन्यथा घसरलेले डब्बे पूलाखालील चिपळूण कराड रोडवरील वाहनांवर कोसळून मोठी दुर्घटना टळली असती.. अद्याप मदत आणि बचावकार्य राबवणारी व्हॅन घटनास्थळी पोहोचलेली नाही. त्यामुळं रुळाचं काम रखडलंय. रुळाचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक ठप्प राहणार आहे.
दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, सीएसटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर आदींसह अनेक गाड्या रद्द करम्यात आल्या.
या गाड्या वळवण्यात आल्यात
Trains Diverted: UP Trains:
1) 16346 Trivandrum-LTT ‘Netravati’ Express which left Trivandrum on 06/10/2014
2) 16334 Trivandrum-Veraval Express which left Trivandrum on 06/10/2014
3) 19577 Tirunvelveli-HAPA Express which left Tirunelveli on 06/07/2014
Down Trains:
1) 16345 LTT-Trivandrum ‘ Netravati’ Express of 07/10/2014
2) 12619 LTT-Mangalore ‘Matsyagandha’ Express of 07/10/2014
3) 22113 LTT-Kochuveli Express of 07/10/2014
या गाड्या रद्द आल्यात
Trains Cancelled : Down Trains:
1) 10103 CSTM-Madgaon ‘Mandovi’ Express of 07/10//2014 .
2) 12051 Dadar-Madgaon ‘Janashatabdi’ Express of 07/10//2014 .
3) 50105 DIVA-Sawantwadi Passenger of 07/10//2014
UP Trains:
1) 10104 Madgaon-CSTM ‘ Mandovi’ Express of 07/10//2014 .
2) 12052 Madgaon-Dadar ‘Janshatabdi’ Express of 07/10//2014 .
3) 50106 Sawantwadi-DIVA Passenger of 07/10//2014
4) 50104 Ratnagiri-Dadar passenger of 07/10//2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.