महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला

छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं तर आपल्यासमोर सह्याद्रीच्या कड्या कपारीत असणारे भक्कम ऐतीहासीक किल्ले नजरेसमोर येतात. पण यातील अनेक किल्ल्यांची आवस्था आज प्रत्येकांला लाजवेल अशी आहे. अशातच अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली दिसतात. त्यापैकीच एक असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड. छत्रपती बांधलेल्या या किल्ल्यावर चक्क अतिक्रमण करुन मन्नत व्हिला बांधल्याचं उघड झालय. ही बाब शिवप्रेमींच्या लक्षात येताच प्रशासनान काही तासात हे अतिक्रमण हटवलं. पण अतिक्रमण होवुन घर बाधेपर्यत पुरातत्व विभाग, वनविभाग आणि प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 30, 2016, 11:22 PM IST
महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं तर आपल्यासमोर सह्याद्रीच्या कड्या कपारीत असणारे भक्कम ऐतीहासीक किल्ले नजरेसमोर येतात. पण यातील अनेक किल्ल्यांची आवस्था आज प्रत्येकांला लाजवेल अशी आहे. अशातच अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली दिसतात. त्यापैकीच एक असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड. छत्रपती बांधलेल्या या किल्ल्यावर चक्क अतिक्रमण करुन मन्नत व्हिला बांधल्याचं उघड झालय. ही बाब शिवप्रेमींच्या लक्षात येताच प्रशासनान काही तासात हे अतिक्रमण हटवलं. पण अतिक्रमण होवुन घर बाधेपर्यत पुरातत्व विभाग, वनविभाग आणि प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.

महाराष्ट्राचं आणि पर्यायानं देशाचं वैभव म्हणजे छत्रपती शिवरायांचे गडकोट किल्ले होय. आज महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची तटबंदी आणि इतर भाग ढासळत चाललेत. त्यामुळं किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्व कमी होत चालले आहे. यापैकीच एक किल्ला म्हणजे  कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड....हा किल्ला पन्हाळ्याचा जोडकिल्ला म्हणून ओळखला जातो. इ.स.१६७३ मध्ये शिवरायांनी पावनगड बांधला. त्यानंतर करवीर संस्थानच्या महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत औरंगजेबाने लाखभर सैन्यानिशी पन्हाळा – पावनगडाला वेढा घातला पण या दुर्गजोडीने हा वेढा निष्प्रभ केला. 

 

एवढा मोठा ऐतिसाहीक संदर्भ असतानाही या गडाकडं पुरातत्व विभाग, पन्हाळा नगरपालिका आणि वनविभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानं चक्क सिंकदर मुजावर या व्यक्तीनं गडाचा बुरुज पाडुन त्या ठिकाणी मन्नत व्हिला बांधला. पुरातत्व विभाग, पन्हाळा नगरपालिका, वन विभागाला याची कल्पना होती, पण त्यांनी याकडं दुर्लक्ष केल्याचं उघड झालंय. इतकंच नव्हे तर या घराला महावितरण विभागानं चक्क लाईटचं कनेक्शनही दिल्याचं दिसून आलं. यावरुन प्रशासन पुरस्कृत अतिक्रमण होत का असा सवाल शिवप्रेमी विचारत आहेत. 

इतिहास प्रेमींनी ऐतिहासिक पावनगडावर झालेलं अतिक्रमण तत्काळ हटवावं अन्यथा शिवप्रेमी हे अतिक्रमण उद्वस्त करतील असा इशारा दिला. त्यानंतर मात्र प्रशासनाची चांगली भंभेरी उडाली, उपलब्ध असणारे नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांना घेवून प्रशासनानं गडावर केलेलं अतिक्रमण काही तासात उखडून टाकलं.

१८४४ मध्ये इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबरच पावनगड देखील उद्ध्वस्त करून टाकला होता. तरीही त्यातून आज हा किल्ला दिमाखात उभा आहे. असं असताना या गडाचं संरक्षण करण्याऐवजी पुरातत्व विभाग, पन्हाळा नगरपालिका बघ्याची भूमिका घेत गडावर अतिक्रमण होवू देतात. यावरुन शिवरायांच्या गडकोटाचं किती संरक्षण केलं जातंय हे स्पष्ट होतंय. एकीकडं राज्य सरकार अरबी समुद्रात शिवरायांचं भव्य स्मारक उभ करण्याच्या तयारीत आहे, पण दुसरीकडं मात्र शिवरायाचे जिवंतरुपी असणारे गडकोट किल्ले कोण जपणार ? असा प्रश्न सच्चा शिवभक्त विचारतोय.