कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन आजपासून ६ ऑगस्टपर्यंत बंद, उत्सवमूर्ती ठेवणार

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर केमिकल कॉन्झर्व्हेशन प्रक्रिया सुरू दोन दिवसात करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून धार्मिक विधी सुरू झालेत. सहा ऑगस्टपर्यंत हे काम सुरू राहाणार असून भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

Updated: Jul 22, 2015, 01:53 PM IST
कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन आजपासून ६ ऑगस्टपर्यंत बंद, उत्सवमूर्ती ठेवणार  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर केमिकल कॉन्झर्व्हेशन प्रक्रिया सुरू दोन दिवसात करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून धार्मिक विधी सुरू झालेत. सहा ऑगस्टपर्यंत हे काम सुरू राहाणार असून भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून आज केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मूर्तीची पाहणी करणार आहेत.

कोल्हापूरची महालक्ष्मी आता अधिकच तेजस्वी दिसणारेय... कारण करवीर निवासिनी श्री. अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणारेय...२२ जुलैपासून सहा ऑगस्टपर्यंत रासायनिक प्रक्रियेचं काम सुरू राहील. या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. 

२२ जुलैला पहाटे धार्मिक विधी करुन श्री पूजक मूर्तीचे प्राणतत्त्व एका कलशात बंद करतील... मुख्य गाभाऱ्यातल्या दोन पितळी पेटीमध्ये प्राणतत्त्व असलेला कलश आणि उत्सवमूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणारेय.

महालक्ष्मीची मूर्ती आता अधिक तेजस्वी दिसणार असल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.