कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना लाचप्रकरणी आज अटक करण्यात आली. त्यांना लगेच जामीन मंजूर झाला.
५० हजारांच्या जात मुचलक्यावर सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. त्याआधी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तृप्ती माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली.
महापौर तृप्ती माळवी यांना १६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. मात्र प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगून रुग्णालयात होत्या. गेले ३ दिवस या कारणानं त्यांनी अटक टाळली होती.
बुधवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक झाली. तृप्ती माळवी यांना अटक झाल्यानंतर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तर हे कुणाचं तरी षडयंत्र असल्याचा आरोप तृप्ती माळवीनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.