कोल्हापूर : टोलवसुलीविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांची अखेर टोलवसुलीतून मुक्तता होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
टोलवसुली बंद केल्यानंतर आयआरबीला रक्कम कशी परत करायची याबाबतही चर्चा सुरु असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापुर टोलवसुलीबाबत मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्यात झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत कोल्हापूर टोलमुक्त होईल.
टोलनाक्यांवरुन केल्या जाणाऱ्या टोलवसुलीविरोधात गेल्या काही वर्षांपासून विरोध आहे. दोन वर्षापूर्वी टोलवसुलीविरोधात पेटलेल्या आंदोलनादरम्यान टोलनाकेही पेटवण्यात आलेले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.