नागपुरात २४ तासांत ५ हत्या, शहरात २ मृतदेह आढळले

नागपुरात24 तासात दुसऱ्यांदा हत्याकांडाचा प्रकार पुढे आलाय. मंगळवारी पुढे आलेल्या तिहेरी हत्याकांडापाठोपाठ आज सकाळी दुहेरी हत्याकाडांचं प्रकरण पुढे येतंय. नागपूरच्या जयताळा परिसरात दोन मृतदेह आढळले आहेत. 

Updated: Nov 18, 2015, 12:18 PM IST
नागपुरात २४ तासांत ५ हत्या, शहरात २ मृतदेह आढळले title=

नागपूर: नागपुरात24 तासात दुसऱ्यांदा हत्याकांडाचा प्रकार पुढे आलाय. मंगळवारी पुढे आलेल्या तिहेरी हत्याकांडापाठोपाठ आज सकाळी दुहेरी हत्याकाडांचं प्रकरण पुढे येतंय. नागपूरच्या जयताळा परिसरात दोन मृतदेह आढळले आहेत. 

आणखी वाचा - मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या

विशेष म्हणजे हत्या करुन मृतदेहाचा चेहरा विदृप करण्यात आलाय. त्यामुळं मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना घडलीय. पोलीस अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत. पण सलग दुसऱ्या दिवशी हत्येचा प्रकार नागपूर हादरलयं.

दारू पिऊन जुगार खेळताना झालेल्या भांडणात हे हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान, काल नागपुरच्या ग्रामिण भागात तिहेरी हत्याकांड उघडकीस आलं होतं. 

आणखी वाचा - दुसऱ्या लग्नाबाबत कळलं म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं केली पत्नीची हत्या

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.