कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

Updated: Jul 28, 2015, 01:37 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही title=

मुंबई : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी कोकण रेल्वेकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण संपल्याने गणेशभक्त नाराज होते. याची दखल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली असून २२४ गाड्या सोडण्याची घोषणा केलेय. 

कोकण रेल्वे मार्गावर नेहमी गर्दीच दिसून येते. अनेक प्रवासी प्रचंड गर्दीच प्रवास करीत असता. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

सीसीटीव्ही यंत्रणा

कोकण रेल्वेच्या महत्वाच्या आणि गर्दीच्या स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेय.

प्रवाशांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कोकण रेल्वेने हे पाऊल उचल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी सुरुवातीला १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

यात कोलाड, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, करमाली, काणकोण, कारवार, गोकर्ण रोड, भटकळ, उडुपी आणि सुरतकाळ या स्थानकांचा समावेश आहे. सध्या, थिविम आणि मडगाव स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.