कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम गाड्यांच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी-करमाळी दरम्यान शताब्दी प्रीमियम गाडी धावणार आहे.

Updated: Dec 18, 2014, 08:01 AM IST
कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम title=

मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम गाड्यांच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी-करमाळी दरम्यान शताब्दी प्रीमियम गाडी धावणार आहे.

सीएसटी येथून २४ , २६, २८,३१  डिसेंबर आणि २ , ४ जानेवारीला पहाटे ५ वाजता ही गाडी सुटेल. करमाळीला सायंकाळी ४ वाजता ती पोहोचेल. परतीच्या प्रवासात करमाळीतून २५, २७, २९ डिसेंबर आणि १, ५ जानेवारीला सकाळी ७ वाजता ही गाडी सुटेल.  सीएसटीला सायंकाळी ५.५० वाजता ती पोहोचेल. 

या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीत सात एसी चेअर कार आणि एक्‍झिक्‍युटिव्ह चेअर कार आहेत. आज गुरुवारपासून  या गाड्यांचे आरक्षण सुरू होईल. ते केवळ इंटरनेटवरूनच करता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.