लज्जास्पद : भर पंचायतीत महिला सरपंचाचा विनयभंग!

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील गटेवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण करण्यात आलीय. महिला धोरणाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही शरमेचीच गोष्ट आहे. 

Updated: Nov 21, 2014, 08:21 PM IST
लज्जास्पद : भर पंचायतीत महिला सरपंचाचा विनयभंग! title=

पारनेर : अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील गटेवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण करण्यात आलीय. महिला धोरणाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही शरमेचीच गोष्ट आहे. 

याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य भरत गट याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भरतला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीय. भर ग्रामसभेत हा प्रकार घडला.

विकासकामं करताना ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच विचारत नाहीत, असा आरोप सदस्य भरत गट यांनी केला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. हाणामारी सुरू झाल्यावर काही पुरूष सदस्य तिथून निघून गेले. काही महिला सदस्यांनी भरत गट मारहाण करत असताना प्रतिकार केला.

याप्रकरणाची, सरपंचांनी सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. तक्रारीनुसार भरत गट यांच्यावर मारहाण शिवीगाळ असे गुन्हे नोंदवण्यात आले. या गुन्ह्यांखाली त्यांना अटक करून जामीनावर सोडण्यात आलं. 

मात्र, त्यानंतर महिला सरपंचाने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा गट यांना अटक केली. न्यायालयाने गट यांना एकदिवसाची पोलीस कोठडी दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.