अमरावती : मुलीच्या प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सासऱ्याने जावयाची गळा दाबून हत्या केली. अमरावतीमधल्या संजय गांधी नगरमध्ये ही घटना घडली.
तुकाराम ढोके यांनी त्यांचा जावई सचिन सिमोलिया याची हत्या केली. सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार अमरावतीमधल्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी नोंदवण्यात आली होती. या घटनेचे गूढ उलगडत नव्हते. अखेर सचिनच्या आईने याचा पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अखेर सत्य बाहेर आले.
तुकाराम ढोके यांच्या मुलीचा सचिनशी प्रेमविवाह झाला होता. तुकाराम ढोके यांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून ढोके यांनीच जावयाची हत्या केली. याप्रकरणी तुकाराम ढोकेंसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.