महाड दुर्घटना : बेपत्ता गाड्यांचे अवशेष सापडले

महाड दुर्घटना शोधमोहिमेत तवेरा गाडीच्या कॅरेजचा पार्ट आणि एसटीचा एक पार्ट मिळालाय. तब्बल ६३ तासांच्या शोधमोहिमेनंतर सावित्री नदीनं गिळलेली तवेरा कारचे काही अवशेष सापडले आहेत. 

Updated: Aug 5, 2016, 03:42 PM IST
महाड दुर्घटना : बेपत्ता गाड्यांचे अवशेष सापडले title=

महाड : महाड दुर्घटना शोधमोहिमेत तवेरा गाडीच्या कॅरेजचा पार्ट आणि एसटीचा एक पार्ट मिळालाय. तब्बल ६३ तासांच्या शोधमोहिमेनंतर सावित्री नदीनं गिळलेली तवेरा कारचे काही अवशेष सापडले आहेत. 

घटनास्थळापासून अडीच किलोमीटर अंतरावर विसावा हॉटेलच्या मागील बाजूस कारचे अवशेष आढळून आले. नेव्हीच्या बचावपथकाला हे अवशेष आढळले आहेत. 

त्यामुळे या दुर्घटनेत बुडालेली बस आणि इतर वाहनं याच ठिकाणी असण्याचा अंदाज आहे..म्हणून ज्या भागात अवशेष आढळले त्याच पात्राजवळ शोधमोहिम अधिक वेगानं सुरु केली आहे.