मद्याच्या बाटलीवर आता दिसणार होलोग्राम!

मद्य विक्रीमध्ये होलोग्राम वापरण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतलाय. यामुळे बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवता येणार आहे. 

Updated: Apr 19, 2016, 09:10 AM IST
मद्याच्या बाटलीवर आता दिसणार होलोग्राम! title=

मुंबई : मद्य विक्रीमध्ये होलोग्राम वापरण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतलाय. यामुळे बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवता येणार आहे. 

राज्यात मद्यामुळे १२ हजार ५०० कोटींचा महसूल मिळतो. वॅट-सेल्स टॅक्सद्वारे उत्पन्न १८ हजार कोटींपर्यंत जातं. शिवाय होलोग्राममुळे ३ हजार कोटींची भर पडेल, अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिलीय.

मराठवाड्यातील पाणी स्थिति लक्षात घेता पुढील पाच वर्षे साखर कारखाने यांना परवानगी न देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. 

तसंच यापुढे जिथे पाणी असेल आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल तिथेच साखर कारखाने यांना परवानगी दिली जाईल आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बघूनच मद्य निर्मिती कारखान्यांना राज्यात परवानगी दिली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिलीय. 

होलोग्रामचे काय फायदे होणार 

- यापुढे, मद्याच्या बाटल्यांवर 'ट्रॅक अॅन्ड ट्रेस' सुविधेसह 'पॉलिस्टर बेस्ड होलोग्राम' दिसणार

- यामुळे अवैध व बनावट मद्यविक्रीस आळा घालता येईल

- सरकारच्या महसुलात होणारी हजारो कोटी रुपयांची गळती रोखता येणार 

- ज्या मद्याच्या बाटलीवर सरकारचा होलोग्राम नसेल ते मद्य बनावट ठरेल, नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळेल

- या होलोग्रामची सत्यता पडताळण्यासाठी मोफत 'मोबाईल अॅप'ची सुविधा उपलब्ध होणार

-  शिवाय, असे त्यांनी स्पष्ट केले. होलोग्राममुळे मद्याच्या बाटलीची निर्मिती, स्थळ, दिनांक या बाबींसह किरकोळ विक्रेत्यापर्यंतची माहिती प्राप्त होणार आहे.