भगवान महावीर सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी - मुख्यमंत्री

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे भगवान महावीर हे जगातील सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

Updated: Apr 19, 2016, 06:08 PM IST
भगवान महावीर सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी - मुख्यमंत्री title=

नागपूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे भगवान महावीर हे जगातील सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

जैन धर्मातील 24वे तिर्थंकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिसा जैन समाजाचा असून हा समाज महत्वाची भूमिका निभवत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या सरकारनं राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केला. 

गोहत्येमुळे पशुधन आणी गोधन कमी झाल्यानं जमिनीतून मिळणारं उत्पन्न कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पशूधन सांभाळणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले. महावीर जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक जैन वेशभूषा केलेल्या महिलांचं ढोल ताशा पथक सर्वांचंच लक्ष वेधून घेत होतं.