मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळलीये. 

Updated: Sep 4, 2016, 07:42 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

रत्नागिरी : रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळलीये. 

या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 40 जण जखमी झालेत. या जखमींना उपचारासाठी लांजा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

दरम्यान दरीत पडलेली बस काढण्याचे प्रयत्न सुरु असून मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. गेल्या तीन तासांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.