ड्रग्ज रॅकेट प्रकरणावर ममता कुलकर्णीचं स्पष्टीकरण

मुंबई पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणावर अखेर ममता कुलकर्णीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Updated: Apr 30, 2016, 05:07 PM IST
ड्रग्ज रॅकेट प्रकरणावर ममता कुलकर्णीचं स्पष्टीकरण title=

मुंबई: मुंबई पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणावर अखेर ममता कुलकर्णीनं स्पष्टीकरण दिलं आहे. ड्रग्ज डिलिंग आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नसल्याचं ममता म्हणाली आहे. तसंच याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी केनियामध्ये अटक झाल्याच्या बातम्याही तिनं फेटाळल्या आहेत. 

माझ्या नवऱ्याला कौटुंबिक वादामुळे अटक करण्यात आली होती, त्याला दोन महिन्यांनंतर सोडून देण्यात आल्याचं ममता म्हणाली आहे. 

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, यामध्ये ममताचा नवरा विकी गोस्वामीवर ड्रग माफिया असल्याचा आरोप होत आहे. विकी हा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट चालवत असल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. 

ममताची चौकशी केल्यावर विकी गोस्वामीच्या हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या धंद्याबाबत उलगडा होईल, असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे. ठाणे पोलिसांनी सोलापूरमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 2 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. यामध्ये विकी गोस्वामीचं नाव पुढे आलं आहे.