कल्याण : 'व्हॉटसअप'वर झालेला वाद इतका जिव्हारी लागू शकतो की कुणीतरी आपलं जीवनच संपवून टाकतो... खरंय वाटत नाही ना? पण ही दुर्दैवी घटना घडलीय कल्याणमध्ये...
आपल्या मैत्रिणी सोबत चॅटिंग करत असताना पृथ्वी पाटीलचा कुठल्या तरी कारणावरून व्हाट्सअॅपवरच वाद झाला. त्यानंतर तो अचानक घरातून निघून गेला. त्याच्या घरच्यांनी १७ जानेवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
मात्र, दुर्दैवानं त्याचा मृतदेह मंगळवारी कल्याणच्या गांधारी नदीत सापडला. त्यानं ब्रीजवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त होतेय.