अमर भाटिया यांच्या 'त्या' फेसबूक पोस्टवरून खळबळ...

सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक अमर भाटियांचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडालीय. त्यातच भाटिया यांच्या फेसबुक पेजवर नजर टाकली असता, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते का, असा प्रश्न पडतो. 

Updated: Jan 20, 2016, 10:10 AM IST
अमर भाटिया यांच्या 'त्या' फेसबूक पोस्टवरून खळबळ...   title=

बदलापूर : सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक अमर भाटियांचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडालीय. त्यातच भाटिया यांच्या फेसबुक पेजवर नजर टाकली असता, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते का, असा प्रश्न पडतो. 

बांधकाम व्यवसायात प्रसिद्ध असणा-या मोहन ग्रुपचे डायरेक्टर अमर भाटिया यांचा मृतदेह बदलापूरमधील रेल्वे ट्रॅकवर सापडला होता. त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. भाटिया यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या फेसबूक पोस्टवरून ते तणावात असल्याचं जाणवत होतं. त्यांच्या फेसबुक पोस्ट अशा होत्या.

जिंदगी मजदूर हुई जा रही है
और लोग शेठजी कहे जा रहै है....

कब्र की मिट्टी हातमें लिए सोच रहा हूँ, 
लोग मरते है तो फिर उनका गुरूर कहां जाता है

वक्त भी रोया मेरे साथ बैठकर
बोला बन्दे तू ठिक है, 
मै ही खराब चल रहा हूँ. 

किंवा 

दिल करता है मर ही जाऊ...!!!
सुना है बहुत याद किया जाता है मरने के बाद...!!!

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार सुरू होता का, असा प्रश्न पडण्यासारख्या काही पोस्टदेखील त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आहेत.  

यासोबत त्यांच्या वॉलवर आत्महत्या केलेले बिल्डर सूरज परमार यांच्या श्रद्धांजलीची पोस्ट आणि लहान मुलांचे फोटोदेखील आहेत. भाटियांच्या वॉलवरील या पोस्टवरून पोलिसांना काही धागेदोरे मिळतात का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.