जळगाव : जामनेरचे नगराध्यक्ष असलेले पारस ललवाणी यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झुगार खेळताना अटक केलीय.
भुसावळच्या हॉटेल तनरिकामध्ये टाकलेल्या धाडीत त्यांना अटक करण्यात आलीय. या जुगाऱ्यांमध्ये आणखी माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक अली सैयद करीम यांच्यासह भुसावळचे नगरसेवक तसेच फॅक्टरी कामगार नेत्यासह आठ जणांचा समावेश आहे.
घटनास्थळाहून पोलिसांनी १ लाख ८४ हजारांची रोकड, १ चारचाकी तर २ दुचाकी वाहने, ८ मोबाईल जप्त केलेत. जामनेर नगराध्यक्षपारस झुबेरलाल ललवाणी, जामनेरचे माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक अली सैयद करीम, डॉ.सचिन पंढरीनाथ बसेर, व्यापारी किशनचंद आशुमल सोढाई, भुसावळचे नगरसेवक रमेश गुरूनामल नागराणी, व्यापारी रमेश पूनमचंद कोठारी, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी सोसायटीचे चेअरमन सच्चानंद जारलोमल गोधवानी, प्रकाश भगवान पवार अशी या आरोपींची नावे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.