लातूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, दवाखान्यावर एसीबीची धाड

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर आणि दवाखान्यावर एसीबीने धाड मारली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील ६ ठिकाणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली.

Updated: Dec 15, 2015, 10:24 AM IST
लातूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, दवाखान्यावर एसीबीची धाड  title=

उस्मानाबाद : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर आणि दवाखान्यावर एसीबीने धाड मारली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील ६ ठिकाणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली.

डॉ. मोरताळे यांच्या घर, दवाखाना आणि बँकेतील लोकर्सवर एकाच वेळी एसीबीच्या धाडी सुरु झाल्यात. अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा डॉ. मोरताळे सुभाष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डॉ. मोरताळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (वर्ग १) म्हणून पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांचा लातूर शहरात खासगी दवाखाना आहे.

२०१०मध्ये उस्मानाबाद सिव्हील हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून नोकरीस असताना ५००० रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना अटक केली होती.

एसीबीने केलेल्या चौकशीत डॉ. मोरताळे यांच्याकडे २२ टक्के अधिक संपत्ती सापडली होती. तर सरकारी नौकरीतील पदाचा गैरवापर करत, खासगी दवाखान्याद्वारे लाचखोरी करून रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांचे यामुळे धाबे दणाणले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.