पुणे : म्हाडाकडून पुणेकरांना गणेशोत्सवाची अनोखी भेट मिळाली आहे. म्हाडानं तब्बल अडिच हजार घरांची जाहिरात, गणेश चतुर्थीचं औचित्य साधून प्रसिद्ध केली आहे. पुणे विभागातली म्हाडाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी घरांची लॉटरी ठरली आहे.
विविध उत्पन्न गटातल्यांसाठी ही घरं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याखेरीज सोलापूर, तसंच साता-यातल्या फलटणमध्येही म्हाडानं ६७ भूखंड यावेळी विक्रीला काढले आहेत. २५ ऑक्टोबरला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात या लॉटरीची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या पुण्यातल्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत.