पुणे : राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या दूध विक्रीला तीन रुपयांची वाढ तर ग्राहकांना दूध खरेदीला दोन रुपयांची दरवाढ करण्यात आलीय. त्यामुळे आपोआपच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ होणार आहे.
खासगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील कात्रज डेअरी येथे ही बैठक पार पडली. कात्रज, अमुल, चितळे, कृष्णांसह राज्यातील इतर दूध उत्पादक ब्रँडचाही यात समावेश आहे. 11 जानेवारीपासून दूध दरवाढ लागू होणार आहे.