औरंगाबाद : चित्रपटगृहात राष्ट्रगीत हवच कशाला असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे..
अधिक वाचा - राष्ट्रगीताचा अवमान, मनसेने जाळला MIM चा झेंडा
चित्रपटगृहात लोक मनोरंजनासाठी जातात तिथं राष्ट्रगीत आणि अशी नौटंकी हवीच कशाला असं सवाल त्यांनी केला आहे.. यावरूनच आपली राष्ट्रभक्ती कळते का असा प्रश्नही त्यांनी केलाय..
शाळा कॉलेज सरकारी ऑफिस इथं सक्ती उचीत आहे मात्र चित्रपटगृहात सक्ती योग्य नसल्याच त्यांच मत आहे.. मनसेसारख्या पक्षांची राष्ट्रभक्ती अशाच गोष्टींतून पुढं येते त्यामुळंच त्यांचा आज एक आमदार बाकी राहिला असल्याचा टोला जलील यांनी लावला आहे..
मला देशद्रोही म्हणणा-यांनी स्वत: काय आहे हे ही तपासावे असही जलील म्हणाले..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.