गुन्हा दाखल होताच मोहोळचे आमदार रमेश कदम पसार

अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदमांविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार आहेत. 

Updated: Jul 19, 2015, 09:52 PM IST
गुन्हा दाखल होताच मोहोळचे आमदार रमेश कदम पसार  title=

सोलापूर: अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदमांविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार आहेत. 

आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कदमांची पत्रकार परिषद होती. गुन्हा दाखल झाला असून पोलीस आमदार कदमांचा शोध घेत असल्याचा आमदार कानोसा लागल्यान पत्रिकार परिषद अर्ध्यावर सोडून कदम पसार झालेत.

सोलापूरात कदम असून ते बाहेर जावू नये म्हणून चारी नाक्यांवर नाका बंदी करण्यात आली आहे. 

दरम्यान, आपण स्वत:हून पोलिसांना शरण येणार असल्याचं आमदार कदम यांनी सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.