आमदार रमेश कदमची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Updated: Aug 18, 2015, 06:59 PM IST
आमदार रमेश कदमची राष्ट्रवादीतून हकालपट्टी title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया,रत्नागिरी: अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सध्या ते अटकेत आहेत. त्यांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलीय. 

रमेश कदम महामंडळाचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ते अनेक दिवसांपासून फरार होते त्यांना पुण्यातल्या ग्रँड हयात हॉटेलमधून नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. कदम यांना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.