‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

Updated: Sep 18, 2014, 05:00 PM IST
‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे title=

ठाणे: सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

ठाण्यात ‘मिक्ता २०१४’ या नाट्य आणि चित्रपट महोत्सवाचं आज राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. याप्रसंगी राज ठाकरेंनी मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी भाष्य केलं. मनसेची ब्लू प्रिंट कधी येणार याची सध्या प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ब्लू प्रिंटच्या प्रकाशनाला रतन टाटा, मुकेश अंबानी येतील हे मलादेखील माहित नव्हतं असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. 

आमची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेनच असं त्यांनी नमूद केलं. तसंच ऑगस्ट महिन्यातच ती सादर करू. मात्र त्याबाबत सतत विचारू नका, असंही राज ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदींवर सोशल मीडियावर टीका सुरु झाल्याच्या माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी भलताच अर्थ काढला असा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडिया हे माध्यमप्रभावी असलं तरी ते आता डोकेदुखी ठरु लागलंय. त्यामुळं सर्वांनी सोशल मीडियापासून थोडं लांब राहायला हवं, असं त्यांनी सांगितलं. 

गेल्या पाच वर्षांपासून मनसेची राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडू असं राज ठाकरे सांगत आहेत. मात्र अद्याप ही ब्लू प्रिंट प्रकाशित करण्यात आली नसून यावरुन राज ठाकरेंवर वारंवार टीका होत आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.