मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
धनगर समाजाला तिस-या सूचीत टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचा आरक्षणाला विरोध नव्हता. फक्त आदिवासी समाजाच्या हक्कांना धक्का लागू नये अशीच त्यांची भूमिका होती असं पवार यांनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादीने १४४ जागांचा आग्रह सोडला
राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांचा आग्रह सोडल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिलेत.. उमेदवारांचा विजय हाच जागा वाटपासाठी निकष असल्याचं पवारांनी सांगितलंय..
त्यामुळं येत्या 19 तारखेला दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. तसंच विधानसभेत कामगिरी नक्की सुधारेल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय…
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.