नागपूर : नागपूरच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई करत, पोलिसांनी ११ गुंडांवर मोक्काची कारवाई केलीय.
घर रिकामं करण्याची धमकी देत स्वप्नील बिडवई या व्यक्तीला धमकावल्या प्रकरणी आणि त्यांच्या घराची तोडफोड केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. मोक्काची कारवाई झालेल्यांमध्ये संतोष आंबेकर, युवराज माथनकर सारख्या सराईत गुंडांचा समावेश आहे.
या पैकी युवराज माथनकर, सचिन अडूळकर, विजय बोरकर आणि लोकेश कुलटकर या चौघांना अटक झाली असून, उर्वरित ७ आणि बिडवईंच्या घराची तोडफोड करणाऱ्या इतर आरोपींना मात्र अजून अटक झालेली नाही.