कल्याण : येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणाच्यावेळी शंभरहून अधिक गावकऱ्ंयाना अन्नातून विषबाधा झालाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधीहलवा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
खोणी गावातील बाळाराम मारुती म्हात्रे यांचे निधन झाले. शुक्रवारी खोणी गावात त्यांचे तेरावे होते. या निमित्ताने जेवणामध्ये गोड म्हणून म्हात्रे यांच्या नातेवाईकांनी दुधी हलव्याची ऑर्डर दिली होती. कल्याण येथील स्वागत स्वीट मार्ट या दुकानदाराला २०० किलो दुधी हलव्याची ही ऑर्डर होती. दुकानदाराने ८०० बॉक्समध्ये ही ऑर्डर दिली. जेवण केल्यानंतर दोन ते तीन तासानंतर अनेकांना उलटी ,जुलाब आणि मळमळ याचा त्रास होऊ लागला.
गावात सर्वांना हा विष बाधेचा प्रकार असल्याच समजले. लागलीच ज्यांना त्रास होत होता त्याना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात, निलजे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि अनेक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकाराबाबत स्वागत स्वीट मार्ट या दुकान मालकावर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सर्व गावऱ्यांची प्रकृती आता चांगली असून उपचारानंतर सर्वच बाधित लोकांना रात्री उशिरा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हा प्रकार रात्री नऊ दहाच्या दरम्यान कल्याण तहसीलदार यांना समजल्यावर रात्री अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात एक वैद्यकीय टीम पाठवून ज्यांना बाधित लोकांना औषधेउपचाराची सोय करण्यात आली. या टीम ने रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान ७० अधिक बाधित लोकांना औषधे दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.