स्टोव्हच्या भडक्यात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या गवल देवी चौक परिसरात स्टोव्हचा भडका उडाल्याने माय लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Updated: Mar 21, 2016, 02:45 PM IST
स्टोव्हच्या भडक्यात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू title=

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या गवल देवी चौक परिसरात स्टोव्हचा भडका उडाल्याने माय लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सकाळी संजुदेवी विश्वकर्मा या स्टोव्ह पेटवत असतांना स्टोव्हचा अचानक भडका उडाला. यात त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने त्या यात ९० टक्के जळाल्या, तर घरात झोपलेल्या चार वर्षांचा आर्यन देखील आगीच्या भक्षस्थानी आल्याने त्याचा देखील यात होरपळून मृत्यू झाला आहे. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मात्र नक्की स्टोव्हचा भडका उडाल्याने ही दुर्घटना घडली आहे की अन्य काही कारण आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.