मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण : शिवसेना-भाजप मंत्र्यांमध्ये तू तू मै मै

 मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरून पुन्हा शिवसेना भाजपमधील मतभेद आज उघड झाले. सार्वजनीक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पनवेल ते इंदापूर या कामाची पाहाणी केली.

Updated: Mar 7, 2015, 11:08 PM IST
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण : शिवसेना-भाजप मंत्र्यांमध्ये तू तू मै मै title=

मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरून पुन्हा शिवसेना भाजपमधील मतभेद आज उघड झाले. सार्वजनीक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पनवेल ते इंदापूर या कामाची पाहाणी केली.

ठेकेदाराला मुदतवाढ देण्यावरून रामदास कदम नाराज होते. तर कर्नाळा अभयारण्य परिसरातल्या जमिनीचं अजून भूसंपादन झालं नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावल्यावर आपण पर्यावरण मंत्री असताना याची फाईल आपल्याकडे आली नसल्याचं सांगत रामदास कदम पुन्हा नाराज झाले.

३१ मार्च २०१६ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. आज दुपारी चंद्रकांत पाटील  आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पेण जवळील महामार्गाची पाहाणी केल्यानंतर ही माहिती दिली. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे व भाजपाचे जिल्हा पदाधिकारी महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी  ऊपस्थित होते.
       
यावेळी झालेल्या चर्चेत पर्यावरण मंत्री कदम यानी विलंब लावणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका असाच पवित्रा घेतला. पण या झालेल्या विलंबावर ८९ मुद्दे माडले गेले.  त्यावर सविस्तर चर्चा करून मंत्री पाटील यांनी या महामार्गाच्या कामात आजपासून ३१ मे २०१५ पर्यंत प्रगती आढळून आली नाही, तर हा ठेकेदार बदलून दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल, असा निर्णय दिला.      

यावेळी महामार्गाच्या या कामात होणाऱ्या या विलंबामुळे अनेक अपघात होऊन निरपराध व्यक्तींना जीव घालवावा लागत आहे. याबाबत लक्ष वेधण्यात आले. चौपदरीकरणाचा उद्देश अजूनही सफल होत नसल्याबद्दल रायगड प्रेस क्लबने मंत्र्यांना निवेदन सादर केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.