सनबर्न पार्टीला अखेर मुंबई हायकोर्टाची परवानगी

 चार दिवसांच्या या फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा

Updated: Dec 28, 2016, 04:31 PM IST
सनबर्न पार्टीला अखेर मुंबई हायकोर्टाची परवानगी title=

पुणे : प्रचंड वादात सापडलेली पुण्यातील सनबर्न पार्टीला अखेर मुंबई हायकोर्टानं परवानगी दिली आहे. त्यामुळं चार दिवसांच्या या फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्याजवळच्या केसनंद गावात होणा-या या सनबर्न पार्टीवरून मोठा वाद निर्माण झाला होता.

गावक-यांसह विविध संघटनांनी सनबर्नला विरोध केला होता. त्यानंतर हा वाद कोर्टात गेला होता. त्यामुळं कोर्टाच्या निर्णयावरून सनबर्नचं भवितव्य अवलंबून होतं. अखेर कोर्टानं सनबर्नविरोधातली याचिका फेटाळून लावली आहे. एवढ्या उशिरा कोर्टात का धाव घेतली असा सवाल कोर्टानं याचिकाकर्त्यांना केला. तसंच या कार्यक्रमादरम्यान काय होऊ शकतं याची याचिकाकर्त्यांना कल्पना नव्हती का असाही प्रश्न कोर्टानं याचिकाकर्त्यांना केला. तर या पार्टीतल्या अंमली पदार्थ सेवन आणि काही आयोजनाच्या पद्धतीवर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी  काही आक्षेप उपस्थित केले. मात्र आयोजकांच्या वकिलांनी हे आक्षेप फेटाळून लावले.