नाशिक-मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण कायम

मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण सुटण्याची अजून चिन्हे नाहीत. मुंबई विमानतळाचा कारभार सांभाळणा-या जीव्हीके कंपनीने टेक ऑफ आणि लँडिंगसाठी जागा दिली नसल्यानं या सेवेचा मुहूर्त पुन्हा एकदा टळलाय. या सेवेसाठी 70 सीटर विमानसेवा एअर इंडियानं सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता.. मात्र जीव्हीकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळं एक मेचा मुहूर्त टळला आहे.

Updated: May 1, 2016, 09:16 PM IST
नाशिक-मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण कायम title=

नाशिक : मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण सुटण्याची अजून चिन्हे नाहीत. मुंबई विमानतळाचा कारभार सांभाळणा-या जीव्हीके कंपनीने टेक ऑफ आणि लँडिंगसाठी जागा दिली नसल्यानं या सेवेचा मुहूर्त पुन्हा एकदा टळलाय. या सेवेसाठी 70 सीटर विमानसेवा एअर इंडियानं सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता.. मात्र जीव्हीकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळं एक मेचा मुहूर्त टळला आहे.

जी.व्ही. के. कंपनी खासगी असून सरकारच्या कंपनीला जागा उपलब्ध करुन देण्यास कंपनीने प्राधान्यक्रम द्यायला हवा होता. मात्र व्यवसायिक स्पर्धेत नफा कमावण्यासाठी शहरे जोडण्याच्या सेवेला लाल कंदील दाखवला जात असल्याचा आरोप खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे.