मुंबई : येत्या १५ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेनची शिस्त न पाळणाऱ्या अवजड वाहनांना मोठा फटका बसणार आहे.
त्यानुसार लेन मोडणाऱ्या अवजड वाहनचालकांकडून दंड आकारण्यात येणार आहे. महामार्ग पोलिस, तसंच नवी मुंबई पोलीस, रायगड आणि पुणे ग्रामीण पोलीस, लेन तोडणा-या अवजड वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहेत.
साधारण एक महिना ही कारवाई सुरु राहणाराय. अवजड वाहनं लेन तोडत असल्यामुळे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची संख्या वाढत असल्याचं पुढे आलंय. त्याला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.